जुन्नरच्या अगदीच पश्चिम टोकाला उंच पठारावर आंबे आणि हातविज नावाची दोन गावं आहेत. त्या गावाच्या आजुबाजुला असलेल्या पठाराला आंबे-हातविजचं पठार किंवा दुर्गवाडी असंही म्हणतात. त्याठिकाणी एक-एक अप्रतिम नैसर्गिक ठिकाणं (स्पॉट्स) आहेत. त्यातील एक म्हणजे हेच आंबे-हातविजचं पठार. ह्या पठाराचं वैशिष्ठ्य म्हणजे इथे साताऱ्याच्या कास पठारासारखी वेगवेगळ्या प्रकारची आणि रंगांची फ़ुले आणि झाडे पहायला मिळतात. ह्या ठिकाणी आजवर साडेसातशे विविध प्रकारची फ़ुलझाडांच्या जाती आढळल्या आहेत. हि गोष्ट खुप आश्चर्यकारक आहे. हे जणु काही जुन्नरचं ’कास’ पठारचं आहे. इथलं पावसाळ्यांतलं निसर्ग सौदर्य म्हणजे डोळ्यात किती भरलं तरी कमीच. इंगळुनचा घाट चढुन गेल्या नंतर साधरणत: पाच किमि पर्यंत हे पठार आहे आणि शेवटी कातळकडा ज्याठिकाणीवरुन खाली मुरबाड तालुका दिसतो.
छायाचित्र

-
स्थळ :नैसर्गिक पुल ता.जुन्नर जि.पुणे
इतिहास
संदर्भ
माहिती आभार : सचिन तोडकर (पत्रकार)
गुगल मॅपवर स्थान
आंबेहातवीज पठार बद्दलची आणखी माहिती वाचा