सुळकयाचे नाव – वानरलिंगी (खडापारशी).
नाणेघाट मधील जिवधन किल्ल्याशेजारी वानरलिंगी हा सुळुका आहे.
नोंद : ह्या संकेतस्थळावरील माहिती सतत अद्ययावत होत आहे.
सुळकयाचे नाव – वानरलिंगी (खडापारशी).
नाणेघाट मधील जिवधन किल्ल्याशेजारी वानरलिंगी हा सुळुका आहे.
आपण जुन्नर शहरात आलात तर नवीन एस.टी स्टॅन्ड मधुन घाटघर जाणाऱ्या एस.टी ने घाटघर ला उतरावे, किंवा आपण बाईकने , कार ने प्रवास करत असाल तर नाणेघाट ला पोहचावे. तेथीलच जवळ असलेल्या श्री. सुभाष आढारी यांच्या छोट्याश्या हाॅटेल पाशी गाडी पार्क करून त्यांना सुळकामार्ग विचारावा. आणि जर आपण कल्याण – माळशेज मार्गाने येणार असाल तर याच मार्गाने माळशेज घाटाआधीच नाणेघाटच्या प्रवासासाठी एक लोखंडी पत्र्याची कमान आहे तेथे उतरावे. त्या मार्गाने नाणेघाट चढून वर आलात तर वरील माहितीच्या आधारे आपण किल्ले जीवधनच्या कड्यात दक्षिणेस असलेला हा वानरलिंगी सुळका आपल्या प्रतिक्षेत असलेला आढळून येतो. वानरलिंगी आरोहण करण्याचे दोन मार्ग आहेत. एक खिंडीतून सुरू होणारा मार्ग तर दुसरा दरीकडील बाजुने सुरू होणारा मार्ग. दोन्ही मार्गावरून कृत्रिम पध्दतीने आरोहण करावे लागते. मुक्त आरोहणासाठी इथे खुपच कमी संधी आहे. पण उच्च श्रेणीचे मुक्त प्रस्तरारोहण करून यातील काही टप्पे पार करता येतील.