सुळ्क्याचे नाव – नानाचा अंगठा. उंची – ३५० फुट. भौगोलिक स्थान – जुन्नर जवळील नानेघाटात नानाचा अंगठा हा कडा आहे. तालुका – जुन्नर. जिल्हा – पुणे. मार्ग – भोसरी-नारायणगाव-जुन्नर-माणिकडोह-नाणेघाट
छायाचित्रे

-
स्थळ : चावंड ता.जुन्नर जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : ३५० फुट
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
इतिहास
सुळक्याबद्दल
सुरवातीलाच अंगावर आलेला कडा असल्याने चढाई अवघड आहे. कड्याच्या शेजारीच ६०० फुट खोल दरी आहे. तेव्हा सावधपणे हे अंतर चढावे लागते. त्यानंतर उभी चढाई आहे. १०० फुटांवर पहिले स्टेशन करावे. नंतर पुन्हा अंगावर आलेला कडा आहे. सुरवातीला उजवीकडे नंतर डावीकडे वळ्णे घेत हा मार्ग आहे. १९० फुटावर दुसरे स्टेशन घ्यावे. पुढे पुन्हा अंगावर आलेला कडा आहे त्या पुढे निसरड्या मार्गाने जात २८० फुटांवर तिसरे स्टेशन घ्यावे. तिसर्या स्टेशन पासुन ८० फुट अंतरावर माथा दिसतो. परंतु भाग निसरडा आहे तेव्हा जपुन चढाई करावी लागते. नंतर १० ते १५ फुट अंतर हे मुक्त चढाईचे आहे. कड्याच्या माथ्यावरुन जीवधन किल्ला त्याशेजारील वानरलिंगी सुळका, हरिश्चंद्रगड व माळशेज घाटातील भैरवगड दिसतात.गिर्यारोहकांचा अनुभव -नानाचा अंगठा कडा सर.
माहिती आभार : प्रशांत पवार
गुगल मॅपवर स्थान
नानाचा अंगठा बद्दलची आणखी माहिती वाचा