MTDC-माळशेज घाट, खुबी गाव, रोहिदासाचा डोंगर, हरिशचंद्रगडाचा बालेकिल्ला, खिरेश्वर गाव, पिंपळगाव-जोगे धरणाचे पाणलोट क्षेत्र असा विस्तारीत प्रदेश आपल्याला या panoramic छायाचित्रात बघायला मिळतो.

-
स्थळ : चावंड ता.जुन्नर जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : 3400
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
सह्याद्री पर्वतरांगेतील अतिप्राचीन अशी ही एक पर्वतरांग. निसर्गाचं देणं लाभलेल्या या परिसरात गेल्यावर मन अगदी प्रसन्न होऊन जातं. धरण परिसर असल्याने १२ माही पाणी उपलब्ध असतं. धरणक्षेत्र असल्याने अनेक प्रकारचे पक्षी येथे आपल्या नजरेस पडतात. या परिसरात धायटी, ऊक्षी, मदवेल, कुडा, पांगळी, हेकल, पानफुटी, गारवेल, सागवृक्ष तसेच बांबूचा बेटे अशा प्रकारच्या नानाविध प्रकारच्या वनस्पती आढळतात.
पावसाळ्यात तर या प्रदेशाच्या सुंदरतेमध्ये आणखीन भर पडते. दुधाच्या फेसाप्रमाणे भासणारे उंच-उंच धबधब्यातून पडणारे पाणी मनाला भुरळ घातल्याशिवाय राहत नाही. photographers साठी तर हा प्रदेश अगदीच उत्तम असा आहे. या भागात बगळे, flemingo, विविध प्रकारचे छोटे पक्षी अशा अनेक प्रकारचे पक्षीदेखील पावसाळ्यात येथे हजेरी लावतात.