MTDC-माळशेज घाट, खुबी गाव, रोहिदासाचा डोंगर, हरिशचंद्रगडाचा बालेकिल्ला, खिरेश्वर गाव, पिंपळगाव-जोगे धरणाचे पाणलोट क्षेत्र असा विस्तारीत प्रदेश आपल्याला या panoramic छायाचित्रात बघायला मिळतो.
नाणेघाट हा पुणे व ठाणे जिल्ह्यांच्या सीमेवरील जुना घाट. हा घाट जुन्नर तालुक्यात पुण्यापासून सु. ९० किमी.वर असून सु. ५ किमी. लांब व ८६० मी. उंच आहे. सु. दोन हजार वर्षांपूर्वी सातवाहनांच्या अमदानीत हा घाट तयार करण्यात आला
आता दाऱ्या घाटाविषयी ..माळशेज घाटाला पर्यायी रस्ता म्हणुन युती सरकारच्या काळात या घाट वाटेचा विचार झाला होता…तशा अर्थाची एक कोनशिला आजही इथे शेवटच्या घटका मोजत आहे.