कृती:
१. एक पातेलीत तेल गरम करून मोहरी, हिंग, हळदीची फोडणी करावी. त्यात चिरलेला निम्मा कांदा गुलाबी रंगावर परतावा. २. कांद्यावर आलं, लसूण वाटलेले, काळा मसाला, २ चमचे लाल तिखट घालून खमंग परतावा. ३. वाफवलेली मटकी कांद्यावर टाकावी. बटाटयाच्या फोडी त्यात घालून त्यात ६-७ वाटया पाणी घालावे. ४. उसळीत कोळलेली चिंच, मीठ, गूळ घालून रस्सा चांगला उकळून घ्यावा. रस्सा पातळ आंबटगोड व झणझणीत तिखट हवा. ह्यालाच सँपल असे म्हणतात. ५. मिसळ करताना खोलगट डिशमध्ये २ मोठे चमचे फरसाण, थोडे खारे दाणे, १ टे.स्पून बारीक चिरलेला कांदा व १ टे.स्पून बारीक चिरलेला टोमॅटो घालावा. ६. त्यावर १ टे.स्पून बारीक शेव, ओला नारळ, कोथिंबीर घालावी. खायला देताना दुसऱ्या बशीत ब्रेडच्या स्लाईस द्यावा. कांदा पोहे व इतर पदार्थ