खेळविलेल्या या मातीने कणाकणातुन तो वारसा जपलाय. म्हणुन तर कोणी घर बांधायला काढले खामगाव चे शिल्प अंगाखांद्यावर आणि शिक्षण जुन्नरची बातच न्यारी…कधीकाळी समृद्धीसोबत संस्कृतीलाही आणि पाया खोदायला घेतला की काहीतरी घडीव दगड, एखादा खापराचा तुकडा, तुटलेल्या मुर्तीचे अवशेष, एखादे नाणे, एखादे शिल्प असे काहीबाही नक्की सापडतेच सापडते. आणि मग हेच सापडलेले अवशेष अधीरपणे इतिहासाच्या गोष्टी सांगु लागतात..आम्ही इथे कसे आलो..इथे काय काय होते असे खुप काही यांच्या तोंडून बाहेर पडायला लागते.
-
स्थळ : खामगाव ता.जुन्नर जि.पुणे
आपल्याला फ़क़्त त्यांची भाषा कळायला हवी. मग अगदी नाणे घाटापासून तर आणे घाटापर्यंत आणि खुबी गावापासून तर बेल्ह्यापर्यंत अशाच गोष्टी पुन्हा पुन्हा समोर येऊ लागतात. जुन्नरमध्ये चांगल्या अवस्थेत असलेल्या लेण्या ते उकीर वाकीर असे मिळून २५० च्या आसपास लेणी आहेत. तसेच गावोगावी सापडणारे वीरगळ, गद्यगळ, सतीशिळा, गजांत लक्ष्मीशिल्प हे वेगळेच. कुठे एखादा घडीव दगड रस्त्याचा बाजुला निपचित पडलेला असतो. खरतर आपल्या आजुबाजुला संस्कृती आणि इतिहास अक्षरशः विखुरलेला आहे. असंच काहीसं काल खामगावला बघायला मिळाले. जुन्नरपासुन माणिकडोह कडे जात असताना साधारण ८-१० की मी रस्त्याच्या उजवीकडे खामगावची वेस आहे. वेशीतून आतमध्ये १ की मी वर खामगावचे गावठाण आहे. डोंगर दरीच्या जवळ असणाऱ्या कुठल्याही गावासारखे इथेपण गावात प्रवेश करताना उंचावर यावे लागते. आधुनिकतेचा स्पर्श झाला असला तरी गावाचे गावपण जपलेले खामगाव प्रथम दर्शनी आपल्याला भुरळ घालते. जुनी जाणती झाडे आपले स्वागत करायला उत्सुक असतातच पण त्याच सोबत कुठलाही कृत्रिम आवाज नाही फ़क़्त निसर्गाचेच गाणे गात हा परिसर निरव शांततेत ध्यानस्थ योग्यासारखा वाटायला लागतो. नकळत आपण फार मोठ्याने बोलतोय असे वाटायला लागते. गावात प्रवेश करताच एक रस्ता आपल्याला उजवीकडे घेऊन जातो. रस्त्याच्या डावीकडे एक जुने झाड आहे आणि त्याच झाडाच्या विरुद्ध बाजूस उजवीकडे एक मंदिर आहे.