- २२०० पूर्वी शंकांची राजधानी असलेला जुन्नर.
- २००० वर्षांचा समृद्ध इतिहास असलेला जुन्नर.
- जगातील बिबट्यांची सर्वात जास्त घनता असणारा जुन्नर.
- जगातील सर्वात मोठी रेडीओ दुर्बीण असणारा जुन्नर.
- जगाला आद्य कृषी शास्रज्ञ देणारा जुन्नर.
- भारतातील प्राचीन व्यापारी मार्ग नाणे घाट असलेला जुन्नर.
- भारतातील पहिल्या स्वराज्याचा सुर्य पाहिलेला जुन्नर.
- भारतातील ७ गिरिदुर्ग असलेला जुन्नर.
- भारतातील सर्वात जास्त लेण्या असलेला जुन्नर.
- भारतातील सर्वात मोठा शिलासेतु असलेला जुन्नर.
- भारताची कृषी आणि ग्रामीण संस्कृती जपणारा जुन्नर.
- महाराष्ट्रातील सर्वात जास्त धरणे असणारा जुन्नर.
- २ अष्टविनायकासोबत “राम कृष्ण हरी” ची देणगी देणारा जुन्नर.
- तमाशाची पंढरी आणि कलाकारांची मांदियाळी असलेला जुन्नर
- महाराष्ट्राला सामुदायिक विवाह सोहळा संकल्पनेची देणगी देणारा जुन्नर.
- यात्रा जत्रेची धुळवड उडवणारा जुन्नर.
- शुद्ध हवेची पखरण करणारा जुन्नर.
- चित्रपट सृष्टीला खुणावणारा जुन्नर.
- निसर्गराजीची बहुहास्ते उधळण करणारा जुन्नर.
- साखरेच्या गोडव्यासोबत दुधाचा सहकार करणारा जुन्नर.
- आवडीनुसार सवड काढून फिरायला येणाऱ्या पर्यटकांचा आवडता जुन्नर.