वैभवशाली जुन्नरला शासनाचा हात
महाराष्ट्राचा मुकुटमणी असलेला वैभवशाली जुन्नर जगाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवण्यासाठी काही विकास कामे इथे होणे गरजेचे आहे. जगाच्या पर्यटन नकाशावर महाराष्ट्राची ओळख अजुन ठसठशीत करण्यासाठी जुन्नरचा पर्यटन विकास होणे गरजेचा आहे.काय काय होवू शकेल
- जुन्नरमधील सर्व गडकिल्ले, लेण्या, धार्मिक स्थळे, घाट, देवराया, ऐतिहासिक ठिकाणे यांच्यापर्यंत जलद गतीने पोहोचण्यासाठी उत्कृष्ट प्रतीच्या दळणवळण सुविधांची नितांत गरज आहे. त्यासाठी पूर्ण जुन्नरभर चांगल्या रस्त्यांचे जाळे असावे.
- मुंबई, पुण्याकडून जुन्नरला अतिजलदगतीने येण्यासाठी सी प्लेन तसेच हेलीकॉप्टर ची सुविधा असावी.
- जुन्नरमधील प्राचीन वारसा जसे कि किल्ले, लेण्या आणि प्राचीन ऐतहासिक ठिकाणे यांचे संवर्धन होणे गरजेचे आहे, हा वारसा जपला जाण्यासाठी वेगळी तरतूद हवी.
- प्रत्येक ऐतिहासिक वारश्याच्या ठिकाणी उत्कृष्ट प्रतीची स्वच्छता गृहे, माहितीफलक, गाईडची सुविधा आणि दळणवळण सुविधा यांचा विकास होणे गरेजेचे आहे. त्यासाठी वेगळी तर्दुस करावी लागेल.
- जुन्नरमध्ये भारतातील सर्वात जास्त लेण्या आहेत, अजिंठा लेण्यांच्या धरतीवर या लेण्यांचा समूहाने विकास व्हावा.
- मुंबईहून कमी वेळात जुन्नरला पोहोचता यावेतसेच माळशेज घाटातील सुरक्षेची अडचण बघता, प्रलंबित असलेल्या दाऱ्या घाटाचे काम होणे नितांत गरजेचे आहे.
- जुन्नरमध्ये असलेल्या धरणांचा उपयोग जल पर्यटनासाठी करता येवू शकेल, त्यासाठी, प्रत्येक धरणाजवळ जल पर्यटनाचे मॉडेल विकसित करून बोटिंग व इतर जलक्रीडा प्रकारांचा विकास करावा लागेल.
- यडगाव धरणाजवळील प्रलंबित यशवंतराव चव्हाण उद्यानाचे प्रत्यक्ष्यात उतरणे गरजेचे आहे.
- जुन्नरमध्ये एकूण १८७ गावांपैकी ६७ गावे हि आदिवासी आहेत, यांच्यासाठी ट्रायबल टुरिझम ची संकापणा राबविता येईल.
- जुन्नरला उपलब्ध असलेल्या वनसंपदेचा उपयोग जैवविविधता पर्यटन, निसर्ग पर्यटन जंगल सफारी यासाठी करता येईल म्हणून त्यासाठी विकास कामे होणे गरजेचे आहे.
- शिवनेरी किल्ल्यावर सुसज्ज उद्यान आणि लेझर शो यांसारख्या सुविधा उपलब्ध करून दिल्या तर पर्यटकांचा ओढा वाढेल.
- शिवनेरी ते लेण्याद्री रोप वे चे काम झाले तर पर्यटकांना कमी वेळात लेण्याद्रीला पोहचता येईल तसेच, जुन्नाच्या विहंगम निसर्गाचा नजारा अनुभवता येईल.
- कमी वेळात पूर्ण जुन्नर पहायचा असेल तर जुन्नरमध्ये हेलीकॉप्टर राईड ठेवुन आकाशातून पूर्ण जुन्नर अनुभवता येईल, त्यासाठी काम होणे गरजेचे आहे.
- जुन्नरमधील पर्यटन वैभव लोकांपर्यंत जाण्यासाठी जुन्नर दर्शन तसेच हेरीटेज वॉक अशा संकल्पना राबवाव्या लागतील.
- रायगड महोत्सवाच्या धरतीवर शिवजयंतीला जुन्नरमध्ये शिवनेरी महोत्सव भरवला गेलं तर पर्यटकांचा ओढ अजून वाढेल त्यासाठी वेगळी तरतूद असावी.
- जुन्नरमधील पर्यटन स्थळांची माहिती येणाऱ्या पर्यटकांना सांगण्यासाठी गाईड तयार होणे गरजेचे आहे, त्यासाठी एका गाईड प्रशिक्षण केंद्राची नितांत आवश्यकता आहे.