जुन्नर तालुक्यात श्री ब्रह्मनाथ देवालय हे प्राचीन असून हे मंदिर सुंदर अशा कोरीव नक्षीकामाचा अत्यंत उत्कृष्ट असा नमुना आहे.
छायाचित्र

-
स्थळ :पारुंडे ब्रम्हणाथ ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
इतिहास
संदर्भ
शांत आणि सुंदर निसर्गाच्या सानिध्यात असलेल्या पारुंडे या गावात भव्य असे मंदिर बांधले आहे. मंदिराच्या गाभाऱ्यात दगडांचे खांब उभारले आहेत व त्यावर सुंदर असे नक्षीकाम केले आहे तसेच देव देवतांच्या मुर्त्या पण कोरलेल्या आहेत. नक्षीकाम केलेला दगड हा अतिशय कठीण आहे व या काळ्या पाषाणावरती नक्षीकाम कसे केले असेल याचे मनात आश्चर्य निर्माण होते.मंदिराच्या शेजारीच श्री ब्रह्मनाथ महाराजांची समाधी आहे.हे तीर्थक्षेत्र अतिशय प्राचीन असून प्रसिद्ध आहे.पोहोचण्याचा मार्ग : जुन्नर – शिवनेरी किल्ला रोड मार्गे – वडज पासून पुढे
माहिती आभार : श्री.खरमाळे रमेश ( माजी सैनिक खोडद )
गुगल मॅपवर स्थान
पारुंडे ब्रम्हणाथ बद्दलची आणखी माहिती वाचा