एका खोलीत तुळजा देवीची स्थापना केलेली आहे. यावरूनच या गटाला तुळजा लेणी असं नाव दिलं गेलं.

-
स्थळ : तुळजा लेणी ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
“डोंगराच्या आतमध्ये लपलेली तुळजा लेणी”तुळजा लेणी जुन्नर गावापासून तीन किलोमीटर अंतरावर आहेत. मुख्य रस्ता सोडून पुढे पाऊल वाटेने जावं लागतं. या गटात एकूण तेरा लेणी आहेत. यापैकी एक चैत्यगृह आणि बाकी विहार आणि सामान्य खोल्या आहेत. तीन लेणी ही अपूर्ण अवस्थेत आहेत. या गटामध्ये दोन पाण्याची कुंडं असून इथे एकही शिलालेख आढळला नाही.लेणी क्रमांक ४ आणि ५ लहानसा विहार असून त्याचा दर्शन भाग तुटला आहे. एका खोलीत तुळजा देवीची स्थापना केलेली आहे. यावरूनच या गटाला तुळजा लेणी असं नाव दिलं गेलं. क्रमांक ८ ते १२ पर्यंतच्या लेण्यामध्ये कलाकुसर आणि थोडीबहुत शिल्पं राहिली आहेत. त्यात वेळबुट्टी चैत्यकमानी सुबक कोरलेल्या दिसतात.
सह्याद्रीतल्या शिल्पकारांनी एकदा चैत्यगृहांचा आकार ठरवला तो एखादा अपवाद वगळता फारसा बदललेला दिसत नाही. कमानदार अश्वनालाकृती गवाक्ष, लंबवर्तुळाकारात खोदलेली गुहा, गजपृष्ठाकार छत, छताला आधार देणारे खांब आणि त्यावर लाकडी फासळ्यांची ओळ, आतील बाजूस भिंतीचा जवळ खोदलेला स्तूप अशी याची सर्वसाधारण रचना. जुन्नरजवळच्या तुळजा लेणीमध्ये मात्र गोलाकार चैत्यगृह आढळून येते.*तुळजा लेणी हि जुन्नरच्या अगदी जवळ असूनही जास्त प्रसिद्धी न मिळालेली पण त्यामुळेच कि काय अतिशय शांत आणि निवांत असलेली हि तुळजा लेणी .पोहोचण्याचा मार्ग :-जुन्नर नवीन बस स्थानक – श्री शिवाजी महाराज पुतळा – सोमतवाडी रोड – सोमतवाडीचा डोंगर – तुळजा लेणीजुन्नर-आपटाळे रस्त्यावर उजव्या बाजुला असणाऱ्या पिंपळेश्वराच्या डोंगरात ह्या लेणी आहेत.
माहिती आभार : प्रतिक साबळे