किल्ले शिवनेरी तसा आपल्या परीचयाचा आहेच परंतु संपूर्ण किल्ला दर्शन घ्यायचे झालेच तर दोन दिवस लागतात. किल्यावर असलेल्या लेण्या या पाच समुहात असून या बौद्ध कालीण आहेत.
छायाचित्र

-
स्थळ : शिवनेरी ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : ८६० मी.
इतिहास
संदर्भ
किल्ले शिवनेरी तसा आपल्या परीचयाचा आहेच परंतु संपूर्ण किल्ला दर्शन घ्यायचे झालेच तर दोन दिवस लागतात. किल्यावर असलेल्या लेण्या या पाच समुहात असून या बौद्ध कालीण आहेत. येथेच 2200 वर्षापुर्वी केलेली रंगाची कलाकृती कडेलोट जवळ असलेल्या लेणी मध्ये पहावयास मिळते.
किल्ले शिवनेरीच्या मध्यखडक सर्कल भागात पुर्वेकडून शिवाई देवी, साखळदंड, व कडेलोट कडे या भागात तीन लेणी समूह असून पश्चिमेस दोन लेणी समूह आहेत. त्यातील एक लेणी हत्ती दरवाजाच्या उत्तरेस अगदी शंभर मीटर अंतरावरच आहे. शिवाई देवी मंदिरापाशी असलेल्या लेण्यांपैकी एका शेवटच्या लेणी मध्ये माता शिवाई देवीचे मुळ वास्तव्य होते. परंतु पेशवाई कालखंडात आज असलेले शिवाईदेवी मंदिर उभारण्यात आले.
किल्ले शिवनेरीला लाभलेला संपूर्ण लेणी संग्रह अनुभवन्यासाठी आपणाकडे दिड दिवस तरी हवा. पायरी मार्गाने शिवाईदेवी लेणी व हत्ती दरवाजवळच्या लेणी पाहता येतात. संपूर्ण किल्ला चढून शिवकुंजापाशी आलात की शेजारीच पुर्वेकडून एक पाऊलवाट साखळदंडाकडे जाते त्याच वाटेने खाली उतरावे व तेथील लेणी पहावी. ती लेणी पाहुन झाली की तसेच कडेलोट पायथ्यकडे गेलेल्या पाऊलवाटेने चालत रहावे व तेथील लेणी पहावीत येथील लेण्यांमध्ये केलेली रंगरंगोटी 2200 वर्षापुर्वीच्या रंगाची जादु दाखवून देतात. या लेण्या पाहून परतीला लागावे व जुन्नर शहराच्या पश्चिमेस गेलेल्या रस्त्याने वरसुबाई माता मंदिर पासुन कडेलोट पायथ्यकडे गेलेल्या पाऊलवाटेने चालत चालत कडेलोट चा मध्य गाठावा. येथुनच उजव्या हाताला बुजलेली पाऊलवाट दिसते. त्या बुजलेल्या वाटेचा मार्ग काढत काढत पश्चिम लेणी समूह पहावा. हा मार्ग खुपच अवघड आहे. येथे स्वसंरक्षण ची काळजी घेणे खुप गरजेचे आहे.तेथील लेणी पाहावीत व पुन्हा परतीच्या मार्गने वरसुबाई माता मंदिर पासुन पश्चिमेस गेलेल्या कच्या वाटेने 2.5 कि.मी अंतरावर असलेल्या तुळजाभवानी लेणी समूहापाशी पोहचावे.
माहिती आभार : सचिन तोडकर (पत्रकार)
गुगल मॅपवर स्थान
शिवनेरी लेणी बद्दलची आणखी माहिती वाचा