@हटकेश्वर मंदिर (जुन्नर तालुका जोतीर्लिंग)@
नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे. हटकेश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्यास काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते, असा उल्लेख काशीखंड या ग्रंथात आहे. असे हजारो भाविकांचे श्रध्दास्थान असलेले हटकेश्वर मंदिर काळाच्या ओघात मात्र दुर्लक्षित राहिले आहे.
या मंदिराला तीर्थक्षेत्र म्हणून दर्जा मिळण्याची मागणी वर्षानुवर्षे दुर्लक्षित आहे. या साठी सातत्याने पाठपुरावा करून देखील ग्रामस्थांच्या पदरी मात्र उपेक्षेपलीकडे काहीही पडलेले नाही . आदिवासी भागातील गोद्रे या गावाजवळील डोंगरावर हटकेश्वर मंदिर आहे. या मंदिराची महती अनेक दुर्मीळ ग्रंथात आहे. श्रावण महिन्यात व महाशिवरात्रीला दर्शनासाठी हजारो भाविक व पर्यटक येथे येतात. जुन्नर तालुका पर्यटन क्षेत्र म्हणून विकसित होत असताना हटकेश्वर डोंगर व त्या भोवतालचा परीसर निसर्गरम्य असूनही विकसित झालेला नाही. या डोंगरावरून लेण्याद्री गणपती, शिवनेरी किल्ल्या, पिंपळगाव जोग धरण, येडगाव धरण, हरिश्चंद्रगड सह्याद्रीच्या रांगा यांचे मनमोहक दर्शन घडून येत. त्यामुळे पर्यटकांसाठी देखील हे ठिकाण महत्वपूर्ण ठरू शकेल असे आहे.
हटकेश्वर मंदिर हे महाराष्ट्रातील एक अतिप्राचीन धार्मिक स्थळ संपूर्ण भारताला माहित व्हावे म्हणून
या क्षेत्राला तीर्थ क्षेत्राचा दर्जा मिळावा व पर्यटन स्थळामध्ये समावेश व्हावा यासाठी जुन्नरकरांनी ही पोस्ट जास्तीत जास्त शेर करावी.
धर्मग्रंथातील हटकेश्वराचे दाखले.या हटकेश्वर मंदिरा बाबत अनेक धार्मिक ग्रंथात माहिती देण्यात आली आहे. ज्ञानेश्वरी अध्याय क्रमाक्र 11 मध्ये म्हटले आहे,
(अर्थ – हिराणाक्षु दैत्य पृथ्वीला काखेत घेऊन एका विवरात घुसला. भगवान शंकरांना या संकटाची जाणिव झाल्याने त्यांनी या दैत्यास पाताळापासुन ज्या गुहेबाहेर काढले ते ठिकाण म्हणजेच हटकेश्वर मंदिर ) नवनाथ ग्रंथात हटकेश्वर मंदिर असलेल्या डोंगरास सोन्याचा डोंगर म्हटले आहे तसेच ( स्कंदपुराण) नागरकथा मध्येही त्याचा गौरवपूर्ण उल्लेख आहे. काशीखंड या ग्रंथात सांगितले आहे की हटकेश्वराच्या दर्शनासाठी तीन वेळा गेल्यास काशी क्षेत्राला गेल्याचे पुण्य लाभते.