भारताचे पहिले वनसंरक्षक म्हणुन दि. 22 मार्च 1847 रोजी यांची नियुक्ती करण्यात आली. भारतातील वन-शास्राचा मुलभूत पाया रोवून त्यांनी संस्मरणीय कामगिरी बजावली. वनस्पती शास्त्रज्ञ व वन – शास्त्रज्ञ या नात्याने त्यांची कारकीर्द भारतीय वन – शास्त्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहीण्यायोग्य आहे. छायाचित्रात दर्शविलेल्या निवासस्थानी डॉ. अलेक्झांडर गिबसन हे सन 1869 मध्ये अनंतात विलीन झाले. त्यांच्या विधवा पत्नीने मृत्यू पश्चात त्यांची उभारलेली स्मृती व संपुर्ण मालमत्ता महाराष्ट्र सरकारच्या वनविभागास बहाल केली.

-
स्थळ : गिब्सन उद्यान ता.जुन्नर जि.पुणे
-
ऊंची : 55 फुट
- रुंद : 60 फुट
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
जुन्नर तालुक्यातील अतिशय सुंदर मध्यवर्तीत असलेले व अनेकांपासुन दुर्लक्षीत असलेले, अवघ्या महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला गर्व वाटावा असे हे ठिकाण परंतु प्रसिद्धीपासुन वंचित असलेल्या या ठिकाणा जवळच अगदी हाकेच्या अंतरावर असलेल्या विघ्नहर सहकारी साखर कारखाना कि ज्यांच्या मुळे असंख्य कुटुंबियांस गोडी लागली परंतु हे ठिकाण अलिप्त राहिले. हो हो मित्रांनो मी मी नारायणगाव पासुन 10 ते 12 कि.मी अंतरावर असलेल्या डॉ. अलेक्झांडर गिबसन यांच्या स्मृती वास्तुबाबत सांगत आहे.
डॉ. अलेक्झांडर गिबसन यांच्या पुण्यतिथीच्या शताब्दीच्या वर्षी त्यांनी केलेल्या संस्मरणीय व अनमोल कार्याचे अधिमुल्य म्हणुन वनविभागाने त्यांच्या स्मृतीचा जिर्णोध्दार केला.मित्रांनो कधी ओझरच्या गणपती दर्शनासाठी गेलात किंवा विघ्नहर सहकारी साखर कारखाना येथे गेलात तर कारखान्याच्या पुर्वेकडे जी.एम.आय.आर.टी अँटेना स्थित असलेल्या या थोर पुरुषाच्या स्मृतीचे एकदातरी नक्कीच दर्शन घ्यायला विसरू नका. माझ्या जिवनात मी पाहिलेली संपूर्ण जुन्नर तालुक्यात अशी कुठेही न आढळून येणारी ही एक अद्भुत वास्तु आहे.व या वास्तूला नारायणगाव वनपरीक्षेत्र कार्यालयाचे संरक्षण देण्यात आले आहे. मी आपणास मला पहावयास मिळालेल्या डॉ. अलेक्झांडर गिबसन यांच्या स्मृती वास्तुबाबत व परीसरातील या लेखा सोबत एक छोटासा छायाचित्र अल्बम देत आहे आपणास आवडला तर नक्कीच शेर करा व तालुका विकासासाठी कटिबद्ध प्रयत्न कराल हीच सदिच्छा.