पुणे परिसरातील शिवाजी महाराजांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला. ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला.
-
स्थळ : जुन्नर, ता.जुन्नर जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : 3400 फूट
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
जीर्णनगर’, ‘जुन्नेर’ म्हणजेच जुन्नर हे शहर इसवीसनापूर्व काळापासून प्रसिद्ध आहे. जुन्नर ही शकराजा नहपानाची राजधानी होती. इ. स 1170 ते 1308 च्या सुमारास यादवांनी येथे आपले राज्य स्थापन केले. आणि याच काळात शिवनेरीला गडाचे स्वरूप प्राप्त झाले. इ. स 1595 मध्ये किल्ला व जुन्नर प्रांत मालोजी राजे भोसले यांच्याकडे आला. जिजामाता गरोदर असताना जाधारावांनी 500 स्वार त्यांच्या सोबत देऊन त्यांना रातोरात शिवनेरीवर घेऊन गेले. “शिवनेरी गडावर श्रीभवानी सिवाई, तीस नवस जिजाऊने केला जे आपल्याला पुत्र झाला तर तुझें नांव ठेवीन. त्याऊपर शिवाजीराजे यांचा जन्म जाला शके 1556 क्षये नाम संवत्सरे वैशाख शुद्ध पंचमी चंद्रवार.’ इ. स. 1632 मध्ये शिवरायांनी गड सोडला आणि 1637 मध्येमोगलांच्या ताब्यात गेला. 1650 मध्ये मोगलांविरूद्ध येथील कोळ्यांनी बंड केले. यात मोगलांचा विजय झाला. इ. स. 1673 मध्ये शिवरायांनी शिवनेरीचा किल्लेदार अजीजखान याला फितवून किल्ल्याला माळ लावून सर करण्याचा अयशस्वी प्रयत्न केला. इ. स. 1678 मध्ये जुन्नर प्रांत लुटला गेला आणि मराठ्यांनी किल्ला घेण्याचा प्रयत्न केला मात्र अपयश पदरात पडले. पुढे 40 वर्षांनंतर 1716 मध्ये शाहुमहाराजांनी किल्ला मराठेशाहीत आणला व नंतर तो पेशव्यांकडे हस्तांतरीत करण्यात आला.
शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरीसकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एक मुघल सरदार रणदुल्ला खान यास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंड मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले. मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत तमाम लोक पकडून आणून कापले गेले आणि नाईकास निर्वंश केले. त्याचबरोबर सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरेदेखील कापली गेली. त्या शीरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या शूर वीराचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.
शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर गावाजवळ, पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. भारत सरकारने या किल्ल्याला दिनांक २६ मे, इ.स. १९०९ रोजी महाराष्ट्रातील राष्ट्रीय संरक्षित स्मारक म्हणून घोषित केलेले आहे.
शिवनेरी हे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचे जन्मस्थान आहे.
एस.टी स्टॅण्डच्या मागे शिवनेरी किल्ला दिसतो. येथून हा किल्ला चार किलोमीटर आहे.या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहेत.या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. शिवनेरी अगदी जुन्नर गावात आहे. जुन्नर मध्ये शिरतानांच शिवनेरीचे दर्शन होते.अंतरावर एका डोंगरमाथ्यावर हा किल्ला बांधलेला असून डोंगराच्या मध्यभागी जवळपास ५० बौद्ध लेणी कोरलेली आहेत. किल्ला आणि लेणी एकत्रित असलेला हा एकमेव डोंगर .
नाणेघाट हा पुरातन व्यापारी मार्ग. या मार्गावरून फार मोठ्या प्रमाणात वाहतूक चालत असे. यावर नजर ठेवण्यासाठी या मार्गावरील दुर्गांची निर्मिती करण्यात आली. सातवाहनांची सत्ता स्थिरावल्यानंतर त्यांनी येथे अनेक ठिकाणी लेणी खोदवून घेतली.
शिवाई देवी मंदिर – सात दरवाज्यांच्या वाटेने गडावर येतांना पाचवा म्हणजे शिपाई दरवाजा पार केल्यावर मुख्य वाट सोडून उजव्या बाजूने पुढे गेल्यावर ‘शिवाई देवीचे ‘ मंदिर लागते. मंदिराच्या मागे असणाऱ्या कड्यात ६ ते ७ गुहा आहेत. या गुहा मुक्कामासाठी अयोग्य आहेत. मंदिरात शिवाई देवीची मूर्ती आहे.
• अंबरखाना – शेवटच्या दरवाज्यातून गडावर प्रवेश केल्यावर समोरच अंबरखाना आहे. आजमितीस या अंबरखान्याची मोठ्या प्रमाणात पडझड झालेली आहे. मात्र पूर्वी या अंबरखान्याचा उपयोग धान्य साठविण्यासाठी केला जात असे. अंबरखान्यापासून दोन वाटा निघतात. एक वाट समोरच असणाऱ्या टेकाडावर जाते. या टेकाडावर एक कोळी चौथरा आणि एक इदगा आहे. दुसरी वाट शिवकुंजापाशी घेऊन जाते.
• पाण्याची टाकी – वाटेत गंगा, जमुना व याशिवाय पाण्याची अनेक टाकी लागतात.
• शिवकुंज – हे शिवनेरी किल्ल्यावरील शिवाजी महाराजांचे स्मारक आहे. याची स्थापना व उद्घाटन महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी केले. जिजाबाईच्या पुढ्यात असलेला बालशिवाजी, हातातील छोटी तलवार फिरवीत आईला आपली भव्य स्वप्ने सांगत आहे, अशा आविर्भावातील मायलेकरांचा पुतळा ‘शिवकुंजा’मध्ये बसविला आहे. शिवकुंजासमोरच कमानी मशीद आहे आणि समोरच खाली पाण्याचे एक टाके आहे. येथून समोर चालत गेल्यास हमामखाना लागतो.
• कोळी चौथरा, शिवनेरी – पुणे परिसरातील शिवाजी महाराजांच्या कारवाया आदिलशाहीला खुपत होत्या. मुघलांना जरी त्या ठाऊक असल्या तरी अजून त्यांना त्याचा थेट उपसर्ग होत नव्हता. योगोयोग म्हणावा का ते माहित नाही पण त्याच सुमाराला काही महादेव कोळी लोकांनी मुघलांविरुद्ध आघाडी उघडून जुन्नर व शिवनेरीचा ताबा घेतला.
ह्यापूर्वी हा भाग निजामशाहीकडे होता. निजामशाही पडल्यानंतर सीमाभागाकडे आदिलशाहीचे व मुघलांचे थोडे दुर्लक्ष होत होते. कदाचित ह्याचा फायदा घेऊन ह्या महादेव कोळ्यांनी त्या प्रांतावर अधिकार स्थापित केला.
शिवरायांच्या स्वराज्याच्या हाकेने प्रेरित झालेले मावळातले महादेव कोळी वीर खेमा नाईकाच्या नेतृत्वात मुघल सत्तेविरुद्ध दंड थोपटते झाले. शिवनेरीसकट आपले सारे किल्ले त्यांनी जिंकून घेतले. दख्खन पादाक्रांत करण्यासाठी तेव्हा शहजादा असलेला औरंगजेब लाखोंचे सैन्य घेऊन आला होता. त्याने एक मुघल सरदार रणदुल्ला खान यास हजारोंची फौज देऊन हे महादेव कोळ्यांचे बंड मोडून काढण्यास पाठविले. एवढ्या प्रचंड फौजेपुढे मावळे टिकले नाहीत. कित्येक मारले गेले आणि खेमा नाईकासमवेत दीड हजार बंदी बनविण्यात आले. मुघलांची दहशत बसावी म्हणून नाईकाच्या रक्तसंबंधातले तान्ह्या बाळापासून तर वृद्धांपर्यंत तमाम लोक पकडून आणून कापले गेले आणि नाईकास निर्वंश केले. त्याचबरोबर सगळ्या दीड हजार बंदी केलेल्यांची शीरेदेखील कापली गेली. त्या शीरांच्या ढीगावरच एक चबुतरा बांधण्यात आला. हाच तो कोळी चौथरा जो आजही शिवनेरीवर पाहायला मिळतो. इतिहासाच्या कुठल्याच नोंदीत त्या वीरांची नावे उपलब्ध नाहीत. नाईकाचे खरे नाव, गाव आदी काहीच उपलब्ध नाही. खेमा/खेमू नाईक असा त्या शूर वीराचा उल्लेख फक्त काही ठिकाणी आढळतो.
ह्या नरसंहाराची आठवण म्हणून आज त्या चौथऱ्याला कोळी चौथरा नावाने संबोधिले जाते. नंतर त्या चौथऱ्यावर एक घुमटी बांधली गेली व त्यावर फारसीमधे दोन शिलालेखदेखिल आहेत.
दुर्दैवाने आज त्या महादेव कोळ्यांची किंवा त्यांच्या म्होरक्याची नावे उपलब्ध नाहीत. इस्लामी राज्यकर्त्यांनी त्यावेळी केलेल्या अनेक नरसंहारांपैकी एक म्हणून ही घटना गणली जाते.
• शिवजन्मस्थान इमारत – शिवकुंजापासूनच पुढे शिवजन्मस्थानाची इमारत आहे. ही इमारत दुमजली असून खालच्या खोलीत जिथे शिवाजीचा जन्म झाला तेथे त्याचा एक पुतळा बसविण्यात आला आहे. इमारतीच्या समोरच ‘बदामी’नामक पाण्याचे टाके आहे.
• कडेलोट कडा – येथून पुढे जाणारा रस्ता कडेलोट टोकावर घेऊन जातो. सुमारे दीड हजार फूट उंचीचा ह्या सरळसोट कड्याचा उपयोग हा गुन्हेगारांना शिक्षा देण्यासाठी होत असे.
गड फिरण्यास 2 तास पुरतात.
वर किल्ल्यावरून चावंड, नाणेघाट आणि जीवधन तसेच समोर असणारा वडज धरणाचा जलाशय लक्ष्य वेधून घेतो.
साखळीची वाट : या वाटेने गडावर यायचे झाल्यास जुन्नर शहरात शिरल्यानंतर नव्या बसस्टॅंड समोरील रस्त्याने शिवपुतळ्यापाशी यावे.येथे चार रस्ते एकत्र मिळतात . डाव्या बाजूस जाणा-या रस्त्याने साधारणत: एक किलोमीटर गेल्यावर रस्त्याच्या उजव्या कडेला एक मंदिरलागते. मंदिरासमोरून जाणारी मळलेली पायवाट थेट शिवनेरी किल्ल्याच्या एका कातळभिंतीपाशी घेऊन जाते.भिंतीला लावलेल्यासाखळीच्या साह्याने आणि कातळात खोदलेल्या पाय-यांच्या साह्याने वर पोहचता येते. ही वाट थोडी अवघड असून गडावर पोहचण्यास पाऊण तास लागतो.
सात दरवाज्यांची वाट : शिवपुतळ्यापासून डाव्या बाजूच्या रस्त्याने चालत सुटल्यास डांबरी रस्ता आपणास गडाच्या पाय-यांपाशी घेऊनजातो. या वाटेने गडावर येतांना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा या मार्गे किल्ल्यावर पोहचण्यासाठी दीड तास लागतो.