सह्याद्रीच्या बालाघाट रांग ही पश्चिम पूर्व पसरलेली आहे. ती नाशिक, नगर आणि पूणे या जिल्ह्र्यांयना छेदत पुढे जाते. या रांगेत अनेक दुर्गपुष्प आहेत, अनेक घाट वाटा आहेत. माळशेज, दर्या्घाट, नाणेघाट, साकुर्डीघाट असे अनेक घाट आहेत तर हरिश्चंद्रगड, कुंजरगड, पाबर, कलाड, निमगिरी, हडसर आणि भैरव सारखे किल्ले आहेत. यातील हरिश्चंद्रगड एकच उजवा बाकी सर्व डावेच असे म्हणावे लागेल. हरिश्चंद्रगडाच्या एकदम समोर निमगिरी किल्ला आहे.

-
स्थळ : निमगिरी, ता.जुन्नर, जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : 2900 फूट
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
-
जाण्यासाठी लागणारा वेळ : १ तास
- श्रेणी : मध्यम
–
किल्ल्याच्या पायऱ्या प्रथम उजवीकडच्या डोंगरावर घेऊन जातात. दरवाजाच्याच बाजूला पहारेकर्यांाच्या खोल्या आहेत. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. यापैकी काही टाक्यातील पाणी पिण्यास योग्य आहे. ही टाकी पाहून किल्ल्याचा फेरफटका मारायला निघायचे. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत. आतमध्ये एक खोली आहे. यात ५ त ६ जणांना मुक्काम करता येतो. हे पाहून गडाची सर्वात वरची टेकडी चढायला लागायचे. वाटेत पुन्हा खराब पाण्याची दोन टाकी लागतात. समोरच एक महादेवाचे मंदिर आहे. यात शिवाच्या डोक्यावर सोंडा उगारलेल्या हत्तीचे शिल्प आहे. सर्वात वरच्या भागात काही घरांचे व वाड्र्यांसचे अवशेष आहेत. येथून हरिश्चंद्रगडाचा बालेकिल्ला आणि टोलारखिंड दिसते. समोर चावंडचा किल्लाही दिसतो. किल्ल्याच्या समोरच्या डोंगरावर २ पाण्याच्या टाक्र्यां शिवाय आणि गाडल्या गेलेल्या दरवाज्याशिवाय काहीच नाही. संपूर्ण किल्ला फिरण्यास १ तास लागतो.
निमगिरी किल्ल्याचे दोन डोंगर आहेत. आपली चढाई दोन्ही डोंगरांच्या मधून आहे. पाड्याच्या मागील बाजूला बाहेर पडल्यावर वाट एक छोट्याश्या पठारावर जाते. इथे मंदिराचे काही अवशेष दिसतात. त्र्यां च्या समोरच एक मोठे पाण्याचे टाकेही दिसते काही शिल्प इथं पडलेली आहेत. याच्याच वरच्या भागात काळूबाईचे मंदिर आहे. मंदिर मुक्कामासाठी एकदम योग्य जागा आहे. मंदिराच्या समोरच्या झाडांमध्ये तीन समाध्याही पडलेल्या दिसतात. हे पाहून खिंडीच्या दिशेने निघायचे अर्धातास चढून गेल्यावर उजवीकडच्या डोंगराच्या कातळात गुहा दिसतात. यालाच घोड्याच्या पागा असेही म्हणतात. इथून पुढे जाणारी वाट कातळात खोदलेल्या पायर्यांशे ची आहे. पण पायर्याो तुटल्या असल्यामुळे वाट बरीच अडचणीची झाली आहे. या वाटेच्याच खाली एक वाट वळणा वळणाने खिंडीत जाऊन वरच्या पायर्यांय पाशी जाते. या पायर्यांा च्या साह्याने १० मिनिटात गडमाथा गाठता येतो.
पुणे मार्गे – जुन्नर – हडसर – निमगिरी