जुन्नर तालुक्याला जसा निसर्गाचा आणि इतिहासाचा वारसा लाभलेला आहे तसाच दैदिप्यमान वारसा गडकोटांचा देखील आहे. जुन्नरच्या भुमिवर हे गडकोट स्वत:चा इतिहास मोठ्या दिमाखाने घेऊन उभे आहेत काहि ट्रेकर्सच्या प्रतिक्षेत तर काहि डागडुजीच्या. शिवछत्रपतींची जन्मभुमी, सातवाहनांची संस्कृती, पेशव्यांचे शौर्य, निजामशाहीचे राजकारण म्हणजेच जुन्नरचे गडकोट. जुन्नरचा शिवनेरी किल्ला हा सर्वश्रुत आहे पण ट्रेकर्सना किंवा भटक्यांना जुन्नरचे इतर ७ गडकोट एक वेगळा अनुभव देत आहेत. चढायला अवघड आणि अप्रतिम निसर्ग अशी जुन्नरच्या गडकोटांची ख्याती आहे. म्हणुनच एकदा तरी हे सातवाहनांचे आणि मराठ्यांचे किल्ले पहावेच..
१. शिवनेरी
शिवजन्मभुमी म्हणुन जुन्नरची ख्याती आहे ती शिवनेरीमुळे. शिवरायांचे जन्मस्थान, आंबरखाना, शिवाई देवी, कडेलोट, लेण्यांचा किल्ला म्हणजे शिवनेरी. महाराष्ट्र शासनाने ह्या किल्ल्याला विकासनिधी उपलब्ध करुन दिल्यामुळे ह्या किल्ल्याचा कायापालट झाला आहे. किल्ल्यावरील बहुतांश गोष्टींची पुनर्बांधणी केल्यामुळे किल्ल्याला अप्रतिम स्वरुप तयार झाले आहे. परिणामी किल्ल्यावर पर्यटकांची गर्दि होत आहे.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
२. चावंड
जुन्नर तालुक्यामध्ये नाणेघाटाचे पहारेकरी म्हणून नावलौकिक मिळवलेले किल्ले म्हणजे जीवधन, चावंड, हडसर, शिवनेरी आणि नारायणगड. यांपैकी चावंडकिल्ला जुन्नर शहरापासून तासाभराच्या अंतरावर असलेल्या आपटाळे गावानजीक आहे. गडाच्या पायथ्याशी चावंड गाव वसलेले आहे. नाणेघाटापासून जुन्नरच्या दिशेने १५ कि.मी च्या आसपास चावंड वसलेला आहे.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
३. जिवधन
हा किल्ला म्हणजे चहूबाजूने उभा तुटलेला एक कडा आहे. जिथे शत्रूचा तोफखानाही चालत नाही. गडावर जाणारी वाट उभ्या कातळातून शिडीसारखी वर चढते. खोबण्याचा मार्ग व त्यावरील दीड फूट उंचीच्या २४० पायऱ्या चढण्यास कठीण आहेत. वायव्येस किल्ल्यापासून अलग झालेला निमुळता सुळका असून, इथे समोर भयंकर खोल दरी दिसते.पुणे जिल्हय़ातील जुन्नरपासून २७ किलोमीटरवर, प्राचीन नाणेघाटाच्या तोंडाशी आणि घाटघर गावाच्या हद्दीत.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
४. नारायणगड
नारायणगड जगातील सर्वात मोठ्या रेडिओ दुर्बिण जीएम आरटी, खोडद च्या समोर दिसणारा एक छोटासा टुमदार किल्ला. जुन्नर मधील पुणे नाशिक महामार्गावर नारायणगाव पासुन जवळच असलेला हा किल्ला, “नारायणगाव” हे गावाचे नाव याच किल्ल्याच्या नावावरून. नारायण पेशव्यांनी या किल्ल्याचा जीर्णोद्धार केला होता. किल्ल्याचे बांधकाम अपूर्ण अवस्थेत आहे. एक छोटीशी चढण..सुरवातीला काही बांधीवपायऱ्या…पुढे नागमोडी चढती पाउलवाट …नंतर दगडात कोरलेल्या पायऱ्या.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
५. सिंदोळा
सिंदोळा किल्ला माळशेज घाटाच्या माथ्यावर आहे.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
६. निमगीरी
जुन्नर – माणिकडोह – नानेघाट मार्गावर निमगीरी गावाच्या मागच्या बाजुला हा किल्ला आहे. गडमाथ्यावर ४ ते ५ पिण्याच्या पाण्याच्या टाक्या आहेत. थोडे चालून गेल्यावर उत्तर टोकाला काही गुहा आहेत. हि गुहा म्हणजे आतमध्ये एक खोली आहे.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
७. हडसर
हडसर किल्ल्याचे दुसरे नाव म्हणजे पर्वतगड. सातवाहनकालात या गडाची निर्मिती झाली असून या काळात गड मोठा प्रमाणावर राबता होता. नाणेघाटाच्या संरक्षणासाठी नगरच्या सरहद्दीवर हा किल्ला बांधला गेला. १६३७ मध्ये शहाजी राजांनी मोगलांशी केलेल्या तहामध्ये हडसर किल्ल्याचा समावेश होता, असा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रांमध्ये आढळतो. यानंतर १८१८ च्या सुमारास ब्रिटिशांनी जुन्नर व आसपासचे किल्ले जिंकले. हडसर किल्ल्याच्या वाटाही ब्रिटिशांनी सुरुंग लावून फोडल्या.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..
८. कुंजरगड
“कुंज” या संस्कृत शब्दाचा अर्थ हत्ती आहे. याचाच अपभ्रंश होऊन “कुजंरगड” असे पडले असावे. विहिर या पायथ्याच्या गावातून हा गड हत्ती सारखा प्रचंड भासतो.हा किल्ला कोंबड गड या नावानेही ओळखला जातो. पावसाळ्यात या भागात तूफान पाऊस पडतो. कधी कधी अनेक दिवस सूर्याचे दर्शन होत नाही. त्यामूळे पावसाळा ऎन भरात असतांना या भागातील किल्ल्यांवर जाणे टाळावे. पण जर केवळ पावसात मनसोक्त भिजत किल्ला पहायचा असल्यास कुंजरगडा सारखा किल्ला नाही. या भागात अनेक सुंदर धबधबे आहेत.
ह्या किल्ल्याबद्दल अधिक माहितीसाठी येथे क्लिक करा..