जुन्नर मधुन पश्चिमेस 30/35 कि.मी अंतरावर असलेला अतिशय सुंदर व अतिरम्य परीसर. या ठिकाणीच दर्शन घ्यायच म्हटल कि आंबोलीत उतरून दुर्गढाकोबाची पायवाट तुडवत वर चढाव लागत. दलदल तुडवतानाचा अनुभव खुप सुखदायक ठरतो. अतिशय मोठी नैसर्गिक गुहा येथे आपणास पहावयास मिळते.गुराखी बांधवाच अश्रय स्थान म्हणजे हेच ठिकाण.

-
स्थळ : ढाकोबा ता.जुन्नर जि.पुणे
-
किल्ल्याची ऊंची : 3400
-
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
-
डोंगररांग : नाणेघाट
एकाच वेळेस 250 ते 300 पर्यटक येथे अश्रय घेऊ शकतील एवढ मोठ अवाढव्य तीच रूप पहातच बसाव.वरून वाहत येणारा फेसाळलेला अतिशय सुंदर धबधब मनाचा वेध घेऊ लागतो. हे सुंदर रूप न्याहाळतच ढाकोबा वर पदार्पण कराव.
दुसरा मार्ग आपणास भिवाडे गावातून मिळतो परंतु हा मार्ग पावसाळ्यात रूद्र रूप धारण करीत असल्यान त्याचा मोह टाळलेलाच बरा. माझ अडवता मार्ग हाच.कारण जुन्नर तालुक्यातील शिमला म्हणजे हाच मार्ग अस मला वाटत.
ढाकोबा शिखरावर पोहोचलात तर वैकुंठ दर्शन झाल्याचा भास होतो. मित्रांनो ढाकोबा ट्रेक करताना कमीत कमी 5 व्यक्तींच्या ग्रुपने करावा. अतिशय किर्र जंगल असल्याने दिवस असुन सुध्दा रात्रच आहे कि काय अस वाटत. प्रवासात थकलात तर मुक्कामाच एकच ठिकाण म्हणजे ढाकोबा मंदिर.येथेच जवळ पश्चिमेस एक विहीर आहे.पिण्याच्या पाण्यासाठी त्याचाच वापर करावा.
थोडा विरंगुळा म्हणून ढाकोबा मंदिर परीसर स्वच्छ करण्यात घालवलात तर एक समाजिक कार्य केल्याच मानसिक समाधान मिळून जात. मग येताय ना? जुन्नरच्या भेटी.