बेल्हा (ता. जुन्नर) येथील सोमवारच्या प्रसिद्ध असणार्या आठवडे बैल बाजार येथे बैलांची आवक मोठय़ा प्रमाणावर होते.बेल्हा येथील आठवडे बैल बाजार सर्व जिल्ह्यात प्रसिद्ध आहे. या बाजारात बैल बाजाराबरोबरच म्हशींचा बाजार, शेळ्यांचा व तरकारी बाजार मोठा भरतो. बैलांच्या बाजारात खिल्लारी, म्हैसुरी व गावरान बैल मोठय़ा प्रमाणावर विक्रीसाठी येतात. खिल्लारी बैलांच्या जोडीचा भाव ६५ ते ७0 हजार रुपये असा होता. गावरान १ नंबर (हायर) बैलजोडीचा भाव ६0 ते ६५ हजार रुपये असा होता, तर म्हैसुरी बैलजोडीचा भाव ५0 ते ५५ हजार रुपये असा असल्याचे व्यापारी बाळासाहेब भोरे यांनी सांगितले. म्हशीचा भाव ४५ ते ५0 हजार असल्याचे व्यापारी संजय साखला यांनी सांगितले. शेळ्यांचे भावही सध्या तेजीत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या सर्वत्र कारखाने सुरु झाले असून ऊस वाहतुकीकरिता बैलांची अत्यंत गरज लागते. असे बैल खरेदी करण्यासाठीही सध्या मोठी गर्दी दिसत आहे. पाऊस यंदा सर्वच ठिकाणी चांगल्या प्रमाणात पडल्यामुळे बैल खरेदी करण्याकडे शेतकर्यांचा कल जास्त दिसून येत आहे, त्यामुळे बैलांचे भावही वाढलेले आहेत.
छायाचित्र

संदर्भ
माहिती आभार : प्रशांत पवार
गुगल मॅपवर स्थान
बेल्हा बैल बाजार बद्दलची आणखी माहिती वाचा