जुन्नर.. फ़क्त पर्यटन नाही.. जबाबदार पर्यटन
नमस्कार पर्यटक मित्रांनो,
जुन्नरमधे असणाऱ्या पर्यटन वैभवाचा आनंद घेण्यासाठी आपण नेहमीच जुन्नरला येत असता. जुन्नरकर सुद्धा आपले मनापासुन स्वागत आणि आदरातिथ्य करत असतात. जुन्नरमधील गडकिल्ले, लेण्या, सांस्कृतिक वैभव, धार्मिक स्थळे आणि निसर्ग आपल्याला भरभरून देत असतात. कुठल्याही प्रकारचे औद्योगिकीकरण नसलेल्या जुन्नरमधे प्रदूषण विरहित स्वच्छ हवा आहे, सुंदर निसर्ग आहे.या निसर्गाला आपल्यालाच जपायचय, आपण जुन्नरला यावे, पुन्हा पुन्हा यावे, इथल्या पर्यटन वैभवाचा आस्वाद घ्यावा पण एका शिस्तप्रिय वातावरणात. एक जबाबदार पर्यटक कधीच कचरा करणार नाही. वारसा स्थळांवर कधीच काही लिहिणार नाही, प्लास्टिक चा कचरा इकडे तिकडे फेकणार नाही. आपण निसर्गाला जपूया, निसर्ग आपल्याला जपेल. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मभूमीत, पर्यटनाला येत असताना जबाबदारीचे भान ठेऊन जर स्वच्छता राखली तर तो इतरांसाठी आदर्श ठरेल. जुन्नरमधे पर्यटन करताना मी कचरा करणार नाही व कोणाला करू देणार नाही हा संकल्प जर आपण घेतलात तर एक जुन्नरकर म्हणुन मी आपल्या सर्वांचे शिस्तप्रिय पर्यटनासाठी जुन्नरमध्ये नक्कीच सहर्ष स्वागत करिन.